गणेशविसर्जनापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सिंधुदुर्ग- गोवा व पूर्व विदर्भा काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भ खान्देशातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी , नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
गणेश विसर्जनानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा खान्देश तसेच कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील आठवड्यात पावसाचा जोर हलक्या व मध्यम स्वरुपाचा राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.