वांद्रे समुद्रकिनारी पालिका उभारणार 'ट्री हाऊस'

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निधीतून वांद्रे येथील समुद्रकिनारी संपूर्णपणे लाकडात तयार केलेले ‘ट्री हाऊस’ उभारण्यात येणार आहे. या ट्री हाऊसमधून मुंबईकरांना निळाभोर अरबी समुद्र पाहायला मिळेल.

पालिकेकडून उभारण्यात येणारे ट्री हाऊस हे टॉवरसारखे असेल जे दोन मजली घराच्या मॉडेलची प्रतिकृती असेल. हा टॉवर वांद्रे किल्ल्याजवळ बांधला जाणार आहे आणि त्याची रचना मलबार हिलमधील कमला नेहरू पार्कमध्ये असलेल्या ‘ओल्ड वुमन शू व्ह्यूइंग टॉवर’शी सुसंगत असेल.

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्री हाऊसची उंची दुमजली इमारतीएवढी असेल आणि ट्री हाऊस प्रामुख्यानं लाकडानं बांधलेलं असेल. सिमेंटचा वापर केवळ संरचनेच्या पायापुरता मर्यादित असेल.

या एक कोटी रुपये खर्च येणार आहे. पालिका या आठवड्यात प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी नागरी स्थायी समितीमध्ये १ कोटींचा प्रस्ताव ठेवणार आहे. या प्रस्तावानुसार मातीची गुणवत्ता तपासणे आणि प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात येणार आहे.

‘ट्री हाऊस’ उभारण्यासाठी पालिकेनं स्वारस्यपत्रे मागवली होती. त्यातून तीन निविदाकार पुढे आले होते. त्यापैकी एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

ट्रीहाऊस समुद्रकिनारी बांधले जाणार आहे त्यामुळे मातीची गुणवत्ता तपासणे अत्यंत महत्त्वाचे असेल. कंत्राटदारानं सादर केलेल्या अहवालावर अवलंबून, आम्ही एक प्राथमिक डिझाइन तयार करू ज्याचा मसुदा अंतिम बांधकामासाठी तयार केला जाईल,” असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

अधिकार्‍यांनी असंही सांगितलं की, उपनगरातील अशा प्रकारचे हे पहिलेच ट्री टॉप हाऊस असेल आणि लोकांच्या लक्ष वेधून घेतल्यानंतर उपनगरातील इतर भागातही अशीच ट्री हाऊस बांधली जातील.

अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की, जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) या प्रकल्पासाठी निधी देईल आणि पालिका ही अंमलबजावणी आणि देखभाल एजन्सी असेल.

मुंबईतील हॅंगिंग गार्डनमधील म्हातारीच्या बुटासारखे आणखी एक पर्यटनस्थळ लवकरच उपनगरातही उपलब्ध होणार आहे. सहा महिन्यांत हे ‘ट्री हाऊस’ उभारण्यात येणार आहे.


हेही वाचा

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेशी जोडणार

शिवाजी पार्क मैदानातील 'तो' रस्ता वादाच्या भोवऱ्यात

पुढील बातमी
इतर बातम्या