खारघरमधल्या डोंगरात वणवा, आग नियंत्रणात

(Representational Image)
(Representational Image)

नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर बुधवारी रात्री लागलेली आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.  

पण हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. खारघरच्या डोंगरावर लागलेली आग विझलेली आहे. रात्री ३ च्या दरम्यान आग नियंत्रणात आली होती.

खारघर अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आग नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.

खारघरच्या डोंगराला लागूनच अनेक रहिवाशी इमारती आहेत. डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे आहेत. दरम्यान, काल अशाचप्रकारे माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. आणि आज खारघरचा डोंगर वणव्याचा वेढा पडलाय.

सुका कचरा आणि गवतामुळं ही आग पसरत गेली. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते. हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. डोंगराला लागूनच अनेक रहिवासी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे देखील आहेत.


हेही वाचा

मुंबईतील १५ टक्के पाणीकपात रद्द

महाराष्ट्रात ४ वर्षांत २ लाख झाडे बेकायदेशीरपणे तोडली

पुढील बातमी
इतर बातम्या