लहानेंच्या हस्ते पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई - कामगारांनी लिहावे हे कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्वार जे.जे. रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठात डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले. पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाचे प्रकाशन बुधवारी लहाने यांच्याहस्ते बॅलेड इस्टेटमधील मुंबई पोर्ट ट्रस्ट विजयदीपच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाले. मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अॅण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनच्यावतीनं हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कामगारांचा पगार कमी असो किंवा जास्त त्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचं असल्याचेही लहाने म्हणालेत. तसेच कामगारांचे हृदय काय म्हणतं हे लिहिण्यासाठी पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक हे कामगारांसाठी अतिशय उपयुक्त माध्यम असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अॅड एस.के.शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, सेक्रेटरी मारुती विश्वासराव, डॉ. यतीन पटेल, अब्दुलगणी सारंग आदी मान्यवर उपस्थित होते. तर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 1800 एकर जागेचा विकास करताना सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या अशा दोन्ही कामगारांचा प्रधान्यानं विचार करण्यात येईल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी व्यक्त केला. यंदाचे पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक प्रकाशनाचे 20 वे वर्ष आहे. यात कामगारांनी लिहिलेल्या लेख आणि कविता प्राधान्यानं मांडण्यात येतात.

पुढील बातमी
इतर बातम्या