रुपाली-अभिजीतमध्ये रंगणार कॅप्टन्सीची लढत

बिग बॉस मराठीच्या घरातील नाती आता सातव्या आठवड्यामध्ये बरीच बदलताना दिसत आहेत. घरातील जे सदस्य एकमेकांच्या पाठीमागं त्यांना नाव ठेवत होते, त्यांच्याबद्दल बरंच काही वाईट बोलत होते, ज्यांना घरातून कसं बाहेर काढता येईल याबद्दल प्लनिंग करत होते. तेच आता एकमेकांशी बोलताना, मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. बिग बॉसमध्ये सदस्यांना बिग बॉसकडून खूप मोठी शिक्षा मिळाली, ज्यामध्ये सदस्यांना बिग बॉसनी कठोर शब्दांमध्ये खडसावलं. कारण इतके दिवस होऊनही सदस्य घरातील महत्वाच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसले आणि रोजच करतात. आता बिग बॉसनी जप्त केलेल्या वस्तू सदस्य कसे परत मिळवणार हे पहायचं आहे.

कॅप्टनसीचं कार्य 

अतिथी देवो भव: या टास्कमध्ये टीम ए आणि टीम बी मधील सदस्यांनी उत्तम कामगिरी केली आणि दोन्ही टीममधील एका सदस्याला कॅप्टन होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी कॅप्टन्सीची उमेदवारी कुठल्या दोन सदस्यांना द्यावी हे टीमनं सर्वानुमते ठरवायचं असल्याचं बिग बॉसनी सदस्यांना सांगितलं. त्यावर रुपाली आणि अभिजीत केळकर ही दोन नावं पुढे आली. यांच्यामध्येच कॅप्टनसीचं कार्य रंगणार आहे. या टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान कोण पटकावणार रुपाली कि अभिजीत? ते पुढं पहायला मिळणार आहे.

रूपाली जमिनीवर कोसळली

रुपाली आणि अभिजीतमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. या कार्यामध्ये विरुध्द टीमच्या उमेदवाराला फोन ठेवण्यास भाग पाडायचं आहे. या टास्कमध्ये वैशालीनं रुपालीला विचारलं की, तुला तरी वाटत का तू कॅप्टन होण्याच्या लायकीची आहे? तू टास्क जिंकण्यासाठी तुझ्या भावाला वापरलंस. रूपालीला हे ऐकून धक्का बसला आणि जमिनीवर कोसळली. नेहा तिच्या मदतीला धावून गेली. आता पुढं काय होईल? रुपाली आणि अभिजीतला फोन ठेवण्यासाठी भाग पडायला सदस्य काय काय ऐकवतील? आणि कोणता सदस्य बाजी मारेल?  हे बघणं रंजक असणार आहे.


हेही वाचा -

Video: 'सर्वसक्तीसाली' गणेश गायतोंडे परत येतोय… ‘या’ तारखेला

संजूच्या मराठी 'बाबा'चा पहिला टीझर प्रदर्शित


पुढील बातमी
इतर बातम्या