अन् उलगडले गझलचे रहस्य...

आजच्या रिमिक्सच्या जमण्यात गझल, नझम आणि शायरीच्या लिखाणाचं प्रमाण कमी होत चाललं आहे. जे शायर गझल आणि नझम लिहतात त्यातही त्यांना कालानुरूप अनेक बदल करावे लागतात. त्यामुळे तिचा खरेपणा कुठेतरी हरवून जातो. आजच्या अनेक नवकवींना आणि शायरांना गझल हा प्रकार माहीत असला तरी ती नेमकी कशी लिहावी? गझल म्हणजे नेमकं काय? हे कळावं म्हणून इर्शाद या संस्थेतर्फे विर्लेपार्ले येथील ई स्वेअर कॉम्प्लेक्स येथे गझल लेखन कार्यशाळा भरवण्यात आली होती.

या कार्यशाळेचे आयोजन कवी देवरूप शर्मा आणि अभिषेक चौधरी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत अनेक नवकवींना गझलचा इतिहास, त्यांचे प्रकार आणि गझल नेमकी कशी लिहावी याचं प्रशिक्षण देण्यात आलं. भारतात मागील 900 वर्षांपासून गझल हा प्रकार चालत आलेला आहे. प्रथम गझलची निर्मिती ही अरब देशात झाली. तिथून ती पर्शियात पसरली आणि पर्शियाततून गझल हा प्रकार भारतात आला. भारतात प्रथमच कुली कुतूब शहा याने गझल लिहली. आजच्या काळात गझलची मूळ कलाकृती हरवत चालली आहे. खरी गझल काय आहे? याचं रहस्य या कार्यशाळेतून खऱ्या अर्थाने नवकवींसमोर उलगडण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या