गेट वे ऑफ इंडियावर नौदल दिनाची धूम

मुंबई - रविवारी 45 वा नौदल दिन धूम धडाक्यात साजरा करण्यात आला. 45व्या नौदल दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडियावर बीटिंग द रिट्रीट सेरिमनीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नौसेनेच्या जवानांनी साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी नौसेनेच्या बँड वादनाचा आस्वाद मुंबईकरांना घेता आला. 1971 मध्ये भारतीय नौसेनेनं पाकिस्तानला युद्धात धूळ चारली होती. नौसेनेच्या या बहादूर कामगिरीची आठवण म्हणून 4 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो.

पुढील बातमी
इतर बातम्या