छठपूजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

  • योगेश राऊत & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

लोखंडवाला कॉम्प्लेक्स - कांदिवली पूर्वेकडील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील कृत्रिम तलाव परिसरात रविवारी संध्याकाळी छठपूजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी कांदिवली पूर्वेकडील अशोकनगरचे विद्यमान नगरसेवक रामाशिष गुप्ता आणि नगरसेविका अंजता यादव यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. छठपूजा झाल्यानंतर गायिका पूनम विश्वकर्मा यांनी भोजपुरी गाणी सादर केली. यादव यांनी राजपती सेवा मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं बिहारी बांधवांनी गर्दी केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या