दत्त जयंती निमित्त हरिनाम सप्ताह

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

घाटकोपर - दत्त जयंती उत्सवानिमित्त ‘अखंड हरिनाम सप्ताह’चं आयोजन करण्यात आलंय. दत्त मंदिर रोड इथल्या ओम श्री दत्त मंदिर ओममध्ये अखंड हरिनाम सप्ताह होणाराय. हा सप्ताह 8 डिसेंबरपासून ते 14 डिसेंबरपर्यंत असणाराय. या सप्ताहात किर्तन सायंकाळी 8 वाजता होणाराय. किर्तनकार मारुती महाराज कोलाटकर यांचे किर्तन, कृष्णानंद महाराज आढाव, गयाबाई यादव, अश्विनी म्हात्रे, सुप्रिया साठे, सुरेश महाराज चांडवेकर, योगेश महाराज वागे या सप्ताहात विविध किर्तनकारांच्या किर्तनाचा लाभ भक्तांना घेता येणाराय.

पुढील बातमी
इतर बातम्या