ग्राहकांची रेलचेल, विक्रेत्याची चांदी

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

गिरगाव - दिवाळी जवळ आली की खरेदीची लगबग सुरू होते. याच निमित्तानं यंदा गिरगावकरांसाठी उत्तम वस्तूंची बाजारपेठ भरवण्यात आली होती. तेजस्विनी प्रतिष्ठानच्या वतीनं एका छताखाली भांडी, दिवाळी फराळ, कपडे, भेटवस्तू, खाद्यपदार्थ असं सबकुछ ठेवण्यात आलं होतं. या बाजारपेठेला गिरगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरवर्षीपेक्षा या वर्षी ग्राहकांची गर्दी जास्त होती, असं विक्रेते सचिन शितूप यांनी सांगितलं. तर योग्य दरात दर्जेदार वस्तू मिळाल्या, असं समाधान राधा जुवाटकर यांनी व्यक्त केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या