बुरा ना मानो होली है...!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - सोमवारी मुंबईच्या विविध भागात रंगपंचमीचा उत्साह पहायला मिळाला. रविवारी वरळीतल्या बीडीडी चाळीत सामाजिक संदेश देणारी 51 फूट उंचीची निषेधाची होळी पोलीस कुटुंबीयांनी जाळली. तर दुसरीकडे दादरमध्ये मनसेच्या वतीने बनावट सीडीची होळी जाळण्यात आली. तसेच प्रभादेवी आणि वरळी कोळीवाडा परिसरात पारंपरिक होळी जाळण्यात आली.

प्रभादेवी - प्रभादेवीमध्ये सोमवारी रंगपंचमीचा उत्साह पहायला मिळाला. लहान मुलांसह मोठेही रंगपंचमीचा आंदन लुटत होते. आम्ही सगळ्यांनी एकत्र येत होळी साजरी केल्याची प्रतिक्रिया रहिवासी संतोष गोलपकर यांनी दिली.

आंबेडकर हॉस्टेल - दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबेडकर हॉस्टेलच्या मुलांनी होळीचा सण उत्साहात साजरा केला. यावेळी मुलांनी इकोफ्रेंडली रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली.

वरळी कोळीवाडा - वरळी कोळीवाड्यातील महिलांनी एकत्र येत रंगांची उधळण केली. महिलांसोबत बच्चेकंपनीने देखील सुक्या रंगांची उधळण केली. यावेळी बच्चेकंपनी डीजेच्या तालावर थिरकताना दिसले.

युवा आधार फाऊंडेशन - चेंबूरमध्ये युवा आधार फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पाण्याची बचत करत कोरड्या रंगांची उधळण केली. तसेच ध्वनी प्रदूषण होऊ नये याची देखील काळजी घेण्यात आल्याचं फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख उबाले यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या