गणेशोत्सव २०१९: अंधेरीच्या राजाला सजवायला आला अमेरिकन डिझायनर...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा यंदा वेगवेगळ्या पेहरावात पाहायला मिळणार आहे. बाप्पाचा आकर्षक पेहराव सजविण्यासाठी अमेरिकेतील एक डिझायनर मुंबईत आला आहे. त्यांच्या कल्पनेनुसार यंदा बाप्पाला सजवलं जाणार आहेमंगळवारी रात्री अंधेरीच्या राजाचं मंडळात आगमन झालं.  

२ सप्टेंबरला विराजमान 

गणपती बाप्पा घराघरात आणि मंडळात २ सप्टेंबर रोजी विराजमान होणार आहेत. यावेळी पहिल्या दिवशी अंधेरीच्या राजाला २४ कॅरेट सोन्याचं ब्रोच घालण्यात येणार आहे. तसंच, या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात बाप्पाला ३ किलो वजनाचं सोन्याचं मुकूट बनविण्यात आलं होतं, ते देखील घालण्यात येणार आहे. हे मुकूट भक्तांनी दान केलेल्या सोन्यातून बनविण्यात आलं असून, या मुकूटाची किंमत १.२५ कोटी रुपये आहे.

साध्या पद्धतीनं सजवणार

या अमेरिकन डिझायनरचं नाव सुमन असं आहे. 'अंधेरीच्या राजाला साध्या पद्धतीनं सजविण्यात येणार असून, पेहरावात धोती असणार आहे. तसंच, भरतनाट्यम सादरीकरण करताना जो साधा पेहराव केला जातो, त्याप्रमाणं बाप्पाचं रुप पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा -

४ दिवसांत एसटी महामंडळाची १०० कोटींची कमाई

तेजुकायाची कागदी लगद्याची गणेशमूर्ती, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद


पुढील बातमी
इतर बातम्या