गणेशोत्सव २०१९: बघा, रितेशने ‘असा’ बनवला इको फ्रेंडली बाप्पा!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

विघ्नहर्त्या गजाननाची आराधना करणाऱ्या बाॅलिवूड सेलिब्रेटिंच्या घरातही दरवर्षी प्रमाणे बाप्पाचं आगमन झालं आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनी स्वत: च्या हाताने साकारलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापन केली आहे. 

रितेशने ट्विटवर एक व्हिडिओ टाकला असून या व्हिडिओ रितेश गणपती बाप्पाची मूर्ती साकारताना दिसत आहे. व्हिडिओसोबत ट्विट करताना रितेशने म्हटलं आहे की, शाडूच्या मातीपासून मी स्वत: गणेश मूर्ती बनवली आहे. 

आपल्या पुढच्या पिढीला प्रदूषणमुक्त सुंदर पर्यावरण ठेवून जाणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. यातूनही मी माझ्या घरी इको फ्रेंडली गणेशाची प्रतिष्ठापणा केली आहे, असं रितेश म्हणाला.


हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: स्वामींच्या रुपातला सह्याद्री क्रीडा मंडळाचा बाप्पा

गणेशोत्सव २०१९: कृत्रित तलावांत गणेश विसर्जनाचं प्रमाण वाढणार का?


पुढील बातमी
इतर बातम्या