नवरात्रीसाठी बाजारपेठा सज्ज

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दादर - नवरात्रोत्सवासाठी बाजारात लगबग सुरु झाली आहे. दादरची बाजारपेठ सज्ज झाली आहे. दादरमधील दुकानात देवीसाठी लागणाऱ्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लहान मुलांसाठी घागरा चोळी, टिपऱ्या, देवीसाठी साड्या, धूप,अगरबत्ती ,होम हवनसाठी लागणाऱ्या गौऱ्या, चंदनाची लाकडे अशा अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. सजावटीसाठी रांगोळ्या आणि प्रसादापर्यंत अनेक गोष्टी बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या