साई पालखी सोहळा

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

प्रभादेवी- साई माऊली मंडळाच्या वतीने गुरुवार १७ नोव्हेंबर पासून ७ दिवसांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी असलेले १५० साईभक्त मुंबईतून शिर्डीपर्यँत दर दिवशी ३५-४० किलोमीटर चालणार आहेत. या पदयात्रेचे आयोजन विनायक भुवड यांनी केले आहे, तर पद यात्रेत १८ ते ५० या वयोगटातील साईभक्तांचा समावेश असणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही तुळशी विवाहानंतर एक दिवस ठरवून त्यानुसार हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या