सांताक्लाॅज देतोय स्वच्छतेचा संदेश

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

परळ - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेचे धडे देण्यासाठी पालिकेच्या एफ-दक्षिण विभागांत पर्यावरण मित्र सांताक्लाॅज हा उपक्रम  राबविण्यात आला आहे. हा उपक्रम ख्रिसमच्या दिवसांत राबविण्यात येत आहे. रविवारी परळच्या ज्या भागांमध्ये कचऱ्याची जास्त निर्मिती होते या भागांत सांताक्लाॅजने स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी वर्धा आर्टच्यावतीने एक सजावट केलेल्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. या वाहनावर 'करा कचरा वर्गिकरण उगमस्थानी, असेल मुंबई स्मार्ट सिटीत अग्रस्थानी' असा संदेश देणारा फलक लावण्यात आला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या