नायगावमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दादर - शिवजयंजी निमित्त नायगाव येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. नायगाव लेबर कॅम्पपासून नायगाव पोलीस वसाहत. ग. द. आंबेकर मार्ग ते पुन्हा लेबर कॅम्प अशी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक बुधवारी काढण्यात आली होती. सद्गुरू सेवा संस्थेच्या शिवजयंती सुवर्ण महोत्सव वर्ष दिनानिमित्त ही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या. संस्थेच्यावतीने रायगड किल्ल्याची 20 फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आली होती. पारंपारिक वेशात महिलांसह पुरुष मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संस्था स्थापनेच्या प्रथम वर्षांपासून शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. संस्थेला 15 मार्चला 50 वर्ष पूर्ण झाल्याने शिवजयंती सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून यंदाची मिरवणूक काढण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या