रविवारी मुंबईत सिद्धीविनायकाची रथयात्रा!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

रविवारी माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त प्रभादेवीतील सिद्धीविनायक मंदिराच्या वतीने भव्य रथयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आजवर भक्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात जात असतात. परंतु, रविवारी सिद्धीविनायकच खुद्द भक्तांच्या भेटी येणार आहे!

प्रभादेवीतील सिद्धीविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा कण्यात येत आहे. या माघी गणेशोत्सवाला १८ जानेवारीपासून सुरुवात झाली असून २४ जानेवारीपर्यंत तो चालणार आहे. रविवारी माघी गणेश चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायकाची भव्य रथयात्रा निघणार आहे. सायंकाळी चार वाजता ही रथयात्रा निघणार असून यंदा हा रथोत्सव आगळयावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

काय असणार रथयात्रेचे वैशिष्टय?

यंदाच्या रथयात्रेत महाराष्ट्राच्या विविध भागातील जवळपास ४०० लोककलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये दशावतार, जाखडी, दांडपट्टा, लेझीम, कोंबडा, आदिवासी ढोल, पालखी, बाल्या, तारपा आदी प्रकारच्या लोककला व परंपरेचे दर्शन घडणार असल्याची माहिती श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

रथयात्रेचा कसा असेल मार्ग?

सिद्धीविनायक मंदिरापासून निघणारी ही रथयात्रा आगार बाजार, पोर्तुगीज चर्च, शंकर घाणेकर मार्ग, अप्पासाहेब मराठे मार्ग ते पुन्हा सिद्धीविनायक मंदिर अशी जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या