बाप्पासाठी हटके मोदक : चॉको लावा आणि गुलबाजाम मोदकाचा नैवेद्य

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

रविवारी अनंत चर्तुदशी आहे. सर्वांचा लाडका बाप्पा त्याच्या घरी जाणार. मग का नाही बाप्पाला त्याच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करावा. बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक. मग खास अनंत चर्तुदशीसाठी स्नॅक्जीमम वेगळ्या प्रकारचे मोदक घेऊन आले आहेत.

मोदकांची खासियत

बाप्पाच्या विसर्जनादिवशी घरोघरी बाप्पाचा आवडता मोदक बनवला जातो. पण सर्वांनाच मोदक बनवणं शक्य नसतं. कुणाला जमत नाही तर कुणाकडं वेळ नसतो. प्रत्येकाची काही ना काही कारणं असतात. मग तुमच्यासाठीच स्नॅक्जीममचा पर्याय आहे ना. स्नॅक्जीमममध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे मोदक मिळतील. तसं पहायला गेलं तर मोदकांमध्ये खोबरं आणि गूळ यापासून बनवलेलं सारण भरलं जातं. पण इथल्या मोदकांची बातच वेगळी आहे. कारण इथं मिळतील तुम्हाला चॉको लावा मोदक, पिनट बटर मोदक, नटेला मोदक, कॉफी मोदक, चॉकलेट मोदक, अॅलमंड रोज मोदक, गुलाबजाम मोदक. आहेत की नाहीत मोदकांचे भन्नाट प्रकार.

हटके मोदकांचा आस्वाद

'चॉको लावा मोदक' हा उकडलेला असतो किंवा खव्यापासून बनवलेला असतो. यामध्ये मेल्ट चॉकलेट असते. चॉको लावा मोदकांचा एक बॉक्स १९५ रुपयाला उपलब्ध आहे. एका बॉक्समध्ये ६ मोदक असतात. याशिवाय 'फरेरो मोदक' यामध्ये चॉकलेट, हॅझलनट आणि गूळ यांचे सारण असते आणि हे मोदक उकडलेले असतात. सहा मोदकांचा एक बॉक्स तुम्हाला १९५ रुपयाला पडेल. आपण गुलाबजाम तर असेच खातो. पण इथं तुमच्यासाठी 'गुलाबजाम मोदक' उपलब्ध आहे. यामध्ये मोदकात गुलाबजाम स्टफ केलेले असतील. 

यावर्षी बाप्पाला वेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायची इच्छा असेल तर स्नॅक्जीममचा चांगला पर्याय आहे.


हेही वाचा -

अबब... एक किलोचा मोदक

...म्हणून बाप्पाला आवडतो मोदक


पुढील बातमी
इतर बातम्या