पारंपरिक कंदिल बनवण्याची लगबग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

वरळी - दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे वरळीत पारंपारिक कागदी कंदिल तयार करून विकणाऱ्या मुलांची अगदी धांदल उडाली आहे. महागाईमुळं कंदिलाच्या कागदांच्या किमतीतही वाढ झाली आहे. पण उरी हल्ल्यानंतर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रेमापोटी परदेशी वस्तूंचा त्याग करत वरळीकर पारंपारीक कंदिलांना यंदा अधिक पसंती देतील, असं कंदिल बनवणाऱ्या मुलांना वाटतंय. सध्या मध्यम आकाराचे कंदिल 50 तर लहान आकाराचे कंदिल 25 रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. कंदिल तयार करणारी ही मुलं वर्षभराची कमाई दिवाळीच्या या दिवसांत करतात. यापैकी काही जण विद्यार्थी आहेत तर काही नोकऱ्याही करतात.

पुढील बातमी
इतर बातम्या