वट पौर्णिमेचा उत्साह गुरुवारी सगळीकडे पहायला मिळाला. वरळीमध्ये सुवासिनींनी विठ्ठल रखुमाई मंदिराजवळील वटवृक्षाची पूजा केली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी तुरळक प्रमाणात पहायला मिळाली. तर दुसरीकडे गोपाळनगर येथील शंकर मंदिराजवळील वटवृक्षाची पूजा अनेक महिलांनी सायंकाळच्या वेळेत केली.
दरवर्षी वटपोर्णिमा, मकर संक्रांती या सणांचा बीडीडी चाळीत एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो. यंदा देखील तोच उत्साह पहायला मिळाला. हिंदू संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे अनेक सुवासिनींनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोठ्या वटवृक्षाची पूजा केली. त्याचप्रमाणे कामाची घाई असणाऱ्या अनेक महिलांनी सकाळी सूर्योदयापासून 12.30 पर्यंतच्या मुहूर्तामध्ये कुंडीतल्या वटवृक्षाची देखील पूजा केल्याचे चित्र पाहायला मिळाले.