देखाव्यातून दिले सामाजिक संदेश

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

वरळी - वरळीतील फटाकडा चाळ सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा देखाव्यातून उरी येथे शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरवर्षी या मंडळाच्या वतीने सामाजिक संदेश दिला जातो. याही वर्षी मंडळाने एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिवसातून किमान 4-5 वेळा देवीची साडी बदलण्यात येते. तसेच गेल्या वर्षी मंडळाने शेतकऱ्यांसाठी मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनलाही मदत केली होती. तर दुसरीकडे गोपाळनगरमधील चेतना क्रिडा मंडळाच्या वतीने देखाव्यातून स्त्री-भृण हत्या थांबवा हा संदेश देण्यात आला आहे. या मंडळामध्ये महिलांना विशेष स्थान आहे. मंडळाचा देवी संदर्भातील सर्व कारभार विभागातील महिलाच पाहतात. मुलींच्या संरक्षणासाठी जनजागृती अत्यंत महत्वाची आहे,असं या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या