10 वर्षांपासून सुविधांचा अभाव

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • दखल

जोगेश्वरी - जोगेश्‍वरी येथे कोकणनगर एसआरए प्रकल्प उभारुन तब्बल १० वर्षांचा काळ उलटला आहे. तरी बिल्डरने अद्याप अपुऱ्या सुविधा देत रहिवाशांना वेठीस धरल्याने या बिल्डरला काळ्या यादीत टाका, असे आदेश गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिले. याची गंभीर दखल घेत गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी या गृहनिर्माण प्रकल्पाच्या ले-आऊटमधील सर्व सुविधा बिल्डरांकडून पूर्ण करुन घ्याव्यात. तसेच ज्या इमारतींना अद्याप ताबा प्रमाणपत्र (ओ.सी) देण्यात आलेले नाही, ते तत्काळ देण्यात यावे,या सुविधा बिल्डरने पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे, असेही आदेश वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या योजनेमध्ये १० इमारती झोपडीवासी आणि दोन इमारती विक्रीसाठी बांधण्यात आल्या. १९९६ मध्ये या प्रकल्पाला सुरूवात झाली. 2004-05 मध्ये रहिवाशांना पझेशन देण्यात आले. या योजनेतील एकुण १० इमारतींपैकी फक्त ७ इमारतींना घरांचा ताबा देण्यात आला. अद्याप ३ इमारतींना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.तसेच सरकारने दुपटीने वाढवल्याने येथील रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

 

पुढील बातमी
इतर बातम्या