आईस्क्रिमला महाराष्ट्रीयन तडका म्हणजे 'सिजलिंग पुरणपोळी'

गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा वयोवृद्ध, आईस्क्रिम हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. तसं तर ऋतू कुठलाही असो आईस्क्रिम मस्ट आहे. पण उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच. कडाक्याच्या उन्हात तेवढाच काय तो थंडावा. अशा या थंडगार आईस्क्रिममध्ये फारशी विविधता नव्हती. आता मात्र निरनिराळ्या स्वादांचे आईस्क्रिम बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सिजलिंग ब्राऊनी...

सिजलिंग पुरणपोळी

सिजलिंग ब्राऊंनी म्हणजे एका गरम पॅनवर ब्राऊनीचा एक तुकडा असतो. त्यावर थंडगार आईस्क्रिम आणि लिक्विड चॉकलेट टाकले जाते. गरम पदार्थात थंड आईस्क्रिम हा वेगळाच प्रकार असल्यानं खवय्यांच्या चांगलाच पसंतीस पडला. पण मुलुंडच्या एका रेस्टॉरंटनं एक पाऊन पुढे टाकत 'सिजलिंग पुरणपोळी' हा नवा आणि हटके प्रकार लाँच केला आहे.

पुरणपोळीला हटके ट्विस्ट

मुलुंडमधील 'बिंदास बेगम रॉकिंग राजा' हे रेस्टॉरंटनं एक वेगळा आणि हटके पदार्थ खवय्यांसाठी लाँच केला आहे. एक वेगळेच कॉम्बिनेशन तुम्हाला इथं चाखता येणार आहे आणि तेही वेगळ्या ढंगात. सिंजलिंग ब्राऊनी सारखाच हा प्रकार आहे. मात्र यात पुरणपोळी हे ट्विस्ट आहे. पुरणपोळी हे महाराष्ट्रीयन पदार्थ आहे हे संगळ्यांनाच माहित आहे. हीच महाराष्ट्रीयन पुरणपोळी एका गरम प्लेटरवर सर्व्ह केली जाईल. त्यावर कॅरेमल सॉस आणि आईस्क्रिम... आहाहा... अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. सिजलिंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला २८० रुपये मोजावे लागतील.

खाद्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न

फक्त सिजलिंग पुरणपोळी नाही तर इथले बरेच पदार्थ हटके आहेत. भारतातील वेगवेगळ्या राज्यातील खाद्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न या रेस्टॉरंटनं केला आहे. महाराष्ट्राच्या पुरणपोळीसोबत तुनम्हाला इथं काश्मिरी, मध्य प्रदेश, गुजरात इथल्या खाद्य संस्कृतीचा देखील आस्वाद घेता येणार आहे. काश्मिरचे प्रसिद्ध खाद्य कुबरगा, मध्ये प्रदेशची भुट्टे की करंजी असे बरेच हटके पदार्थ तुम्हाला चाखता येतील.

तुम्हाला देखील या हटके पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर बिंदास बेगम रॉकिंग राजा या रेस्टॉरंटला नक्की भट द्या.

कुठे : शॉप नंबर, ४०, ४१, ४२, ४३, आर-ग्लोरीआ, रनवेल ग्रीन्स, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, मुंबई

संपर्क : ०७७११९९९९६०


हेही वाचा

इथं मिळतात १८ प्रकारच्या मिसळ, म्हणून हे आहे 'हाऊस ऑफ मिसळ'

तंदुर चायनंतर आता तंदुर मॅगीची क्रेझ

पुढील बातमी
इतर बातम्या