पिझ्झाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जातेय. हा मूळचा इटालियन पदार्थ असला तरीही असंख्य भारतीय या पदार्थाच्या प्रेमात आहेत. भारतीयांकडून पिझ्झाची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्यांनी मुंबईत पिझ्झा आऊटलेट्स सुरू केले आहेत. असंच एक नवीन पिझ्झा आऊटलेट मुंबईतील वांद्रे इथं सुरू झालं आहे. त्याच नावं आहे, ब्रोज पिझ्झा.
ब्रोज पिझ्झाची खासियत म्हणजे इथला मेन्यू. यांच्या मेन्यूमध्ये पिझ्झामध्ये भरपूर व्हरायटी तर आहेतच. शिवाय वेगवेगळ्या डेझर्टचा आस्वाद देखील तुम्हाला घेता येणार आहे. अनेक ठिकाणी पिझ्झा बेस हा फ्रेश नसतो. आधीच बनवलेला पिझ्झा बेस वापरला जातो. पण इथं पिझ्झा बेस बनवला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकेंडमध्ये तुम्हाला अगदी ३ वाजेपर्यंत पिझ्झा डिलिव्हरी देण्यात येईल.
'चारकोल पिझ्झा', 'डि निरोज', 'चिकन खिमा पिझ्झा' असा भरगच्च त्यांचा मेन्यू आहे. मेन्यू प्रमाणे त्यांनी बनवलेले पिझ्झा देखील भरगच्च आहेत. चारकोल पिझ्झामध्ये बफोलो मोझरेला, बासील आमि टॉमेटो आदी पदार्थ असतील. तर डि निरोज हा पिझ्झा दोन प्रकारात खाता येईल. एक इटालियन सॉस तर दुसरा पेपरोनी, पिकल्ड रेड पेपर आणि ऑनियन यामध्ये तुम्ही डि निरोज पिझ्झाचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही तिथला चिकन विंग्स पिझ्झा नक्कीच ट्राय करा.
झणझणीत पिझ्झा खाल्ल्यानंतर काही तरी गोड नक्कीच खावासं वाटंत असेल तुम्हाला. मग तोंड गोड करायला आहेत ना 'न्यूटेला आणि बनाना पिझ्झा', 'डार्क चॉकलेट पिझ्झा'.
पिझ्झावर भन्नाट ऑफर
नुकतंच त्यांचं डिलिव्हरी आऊटलेट सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे २४ जूनपर्यंत खवय्यांसाठी खास ऑफर देण्यात आली आहे. ८ इंच व्हेज पिझ्झासाठी तुम्हाला ९९ रूपये मोजावे लागतील. तर नॉन-व्हेज पिझ्झासाठी १४९ रुपये मोजावे लागतील. आता अजिबात उशीर करू नका. लवकर जाऊन या ऑफरचा लाभ घ्या.
कुठे : टू ब्रोज पिझ्झा, डिलिव्हरी सर्विस, वांद्रे
वेळ : दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत
हेही वाचा-