मॉनसून फेस्टिव्हल : मोमोज, मॅगी आणि बरंच काही

धो-धो कोसळणारा पाऊस... त्यात शनिवार-रविवारचा निवांत वेळ. अशा वातावरणात काही तरी गरमा-गरम होऊन जाऊदे, असं प्रत्येकाच्या तोंडून निघतं. मग ती भजी असो कबाब असो वा आणखी काही असो. फक्त अट एकच जे काही असेल ते स्वादिष्ट आणि चटपटीत असलं पाहिजे. मग हाच विचार करून मुंबईत 'मॉन्सून फेस्टिव्हल' आयोजित करण्यात आला आहे.

मॉन्सून फेस्टिव्हलची खासियत?

पावसाळा सुरू झाला की रस्त्यावरून जाताना कुठूनतरी गरम कांदाभजीचा वास दरवळतो. भूक लागली नसेल तरी आपसूक आपले पाय कांदा भजीचा आस्वाद घेण्यासाठी त्या स्टॉलकडे वळतातच. गरमागरम भजी खात गप्पांचा फड रंगतो तेव्हा पावसाचा आनंद वेगळाच असतो. पाऊस, भजी आणि चहा हे समीकरण तर आता फिक्स झालं आहे. पण आता हे समीकरण बदालायची आवश्यक्ता आहे. म्हणूनच मॉन्सून फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला फक्त भजीच नाही तर मोमोज, मॅगी आणि कबाब या पदार्थांचा आस्वाद घ्यायची संधी मिळणार आहे. जवळपास २५ स्टॉल्स या फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत.

डिलिशियस फुड

  • या फेस्टिव्हलमध्ये मोमोजचे १५ प्रकार चाखता येणार आहेत. 'फ्युजन फेस्ट' आणि 'द खांग डंपलिंग' या रेस्टॉरंटचे स्टॉल इथं असतील.
  • वेगवेगळ्या प्रकारची मॅगी
  • 'बेहरुज बिर्यानी', 'बोहरी किचन' आणि 'चारकोल इट्स' तर्फे कबाब-बिर्यानीचे स्टॉल असतील.
  • 'लोकल अड्डा' आणि '१४४१ पिझ्झारिया' तर्फे पिझ्झा, पास्ता आणि बर्गरचे स्टॉल्स असतील.
  • वेगवेगळ्या प्रकारचे फ्राईज आणि मिल्कशेक
  • 'बार बार' तर्फे कॉकटेल्स

कधी - ७ आणि ८ जुलै २०१८

वेळ - दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत

कुठे - फिनिक्स मार्केटसिटी, कुर्ला


हेही वाचा

चॉकलेटचे झाड!

पुढील बातमी
इतर बातम्या