गणेशोत्सव २०१९: बाप्पासाठीच्या प्रसादावर एफडीएची नजर

दरवर्षी गणेशोत्सवात बाप्पाला मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर ही मिठाई प्रसाद म्हणून गणेशभक्तांना दिली जाते. परंतु, अनेकदा प्रसाद, मोदक आणि मिठायांमधून भाविकांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं यंदा या घटनांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनानं (एफडीए) सर्वच मिठायांवर आणि इतर खाद्यपदार्थांवर करडी नजर ठेवण्यासाठी विषेश मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेर्तंगत एफडीए विविध ठिकाणी तयार होणारे पदार्थ योग्य रीतीनं तयार होता आहेत का? याची तपासणी करणार आहेत. तसंच, सार्वजनिक गणेश मंडळांना अन्नसुरक्षेचे धडेही देणार आहेत.

विशेष मोहिम

एफडीएची ही विशेष मोहिम गणेशोत्सवापासून नवरात्र, दिवाळी ते नाताळपर्यंत म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत चालणार आहे. तसंच, या काळात अन्नसुरक्षेचे सर्व नियम पाळले नाहीत, तर यामधून सर्वसामान्यांना विषबाधा होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकते.

नाशवंत घटक

खवा, मावा, पेढा इत्यादी प्रकारच्या मिठाया तयार करताना त्यामध्ये वापरण्यात येणार घटक नाशवंत असतात. अनेकदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही मंडळांकडून हे पदार्थ साठवून ठेवले जातात. त्यांचा काही कालावधीनंतर वापर केल्यानं विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळं या पदार्थांची योग्यप्रकारं तपासणी होणं गरजेचं आहे, असं अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी म्हटलं.


हेही वाचा -

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी वाहतूक महामार्ग पोलिस सज्ज

महापालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन


पुढील बातमी
इतर बातम्या