शिव थीमवर आधारित ठाण्यातील हटके रेस्टॉरंट

आतापर्यंत आपण वेगवेगळ्या थीमवर आधारित रेस्टॉरंट पाहिले असतील. ठाण्यातदेखील एका हटके थीमवर आधारीत रेस्टॉरंट सुरू झालं आहे. शिव ही या रेस्टॉरंटची थीम आहे. विशेष म्हणजे अनेकदा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट अॅण्ड बारमध्ये गेलात की तुम्हाला तिथंच ड्रिंक प्रोवाईड केलं जातं. बाहेरून काहीच नेण्याची परवानगी नसते. पण इथं तसं नाही. इथं तुम्ही बाहरून ड्रिंक आणू शकता. फक्त खाणं बाहेरून आणण्यास परवानगी नाही.

शिव थीमवर आधारित या रेस्टॉरंटचं नाव आहे शिवा फॉरेस्ट रेस्टॉरंट. रेस्टॉरंटमध्ये मोठी शंकराची मूर्ती पहायला मिळते. शिव थीम असल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये निळ्या रंगाचे निऑन लाईटिंग लावण्यात आली आहे. त्यामुळे इथलं वातावरण काही जणांसाठी थोडं विचित्र असेल. पण तुम्हाला हे वातावरण नक्की आवडेल याची मला खात्री आहेतुमचं आवडतं ड्रिंक घेऊन तुम्ही तुमच्या गँगसोबत इथं जाऊ शकता.

ड्रिंकचे घोट घेत तुम्ही कबाबचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी चायनीज, काँटिनेंटलइंडियननॉर्थ इंडियन आणि इटालीयन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

कुठे : येरूर हिल्स, उपवन तलाव, ठाणे


हेही वाचा 

बार्बिक्यू बाईक राईडसाठी तयार आहात?

'घंटावाला पान मंदिरा'ला एकदा भेट द्याच


पुढील बातमी
इतर बातम्या