शिव्या घाला, टीका करा पण सामना बघायला या, असं भावनिक अावाहन भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यानं केलं होतं. या अावाहनानंतर मुंबई फुटबाॅलमध्ये जादू घडली अाहे. मुंबई फुटबाॅल एरेनामध्ये रंगणारा भारत अाणि केनिया यांच्यातील फुटबाॅल सामन्यावर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला अाहे.
शुक्रवारी भारतीय संघानं तैपेईवर ५-० असा दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी संपूर्ण स्टेडियम खाली पाहून सुनील छेत्रीनं चाहत्यांना भावनिक अावाहन केलं होतं. "लिअोनेल मेस्सी, नेयमार, ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांनो, अाम्हाला शिव्या घाला, टीका करा, पण भारतीय संघाचा सामना पाहायला या, असं अावाहन केलं होतं.
सुनील छेत्रीनं भावनिक अावाहनाचा हा व्हिडियो सोशल मीडियावर टाकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अाणि टेनिसक्वीन सानिया मिर्झा यांनीही भारतीय फुटबाॅल कर्णधाराच्या या अावाहनाला पाठिंबा दर्शवला. सानिया मिर्झानं तर 'कुणी तिकीट देतं का' असं ट्विट केलं अाहे.
हेही वाचा -