अातापर्यंत युरोपमधील महान फुटबाॅलपटूंचा खेळ फक्त टीव्हीवरूनच पाहता अाला अाहे. मात्र या महान खेळाडूंचा खेळ 'याचि देही याचि डोळा' पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार अाहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर बार्सिलोना अाणि युव्हेंट्स या दिग्गज क्लबमधील लिजंड्सचा सामना २७ एप्रिलला संध्याकाळी ७.१० वाजता रंगणार अाहे.
लिअोनेल मेस्सीच्या बार्सिलोना क्लबमधील हुअान कार्लोस राॅड्रिगेझ, इरिक अबिदाल, अँड्रोनी गोइकोइटेक्सिया, फ्रेडेरिक डेहू, एम. ए. नदाल, फ्रँक डे बोएर, गायके मेडिएटा, जोस एडमिलसन, सिमाअो सँब्रोसा, गुडजोसेन, ज्युलियो सलिनास हे लिजंड्स खेळणार अाहेस.
युव्हेंट्सकडून डेव्हिड ट्रेझेगुएट, एडगर डेव्हिड्स, पावलो माँटेरो, सिरो फेरारा, मार्क इलुयानो, मोरेनो टोरीसेली, फॅब्रिझियो रावानेली, माॅरो जर्मन कॅमोरेनासी, स्टेफानो टाकोनी, निकोला अमोरुसो, ख्रिस्तियन झेनोनी, अलेसांड्रो बिरिंडेली, मॅन्यूएल दिमास, गियानलुका झॅम्ब्रोटा या दिग्गज फुटबाॅलपटूंचा सहभाग या सामन्यात असणार अाहे.
बार्सिलोनाचे दिग्गज भारत भेटीवर येणार असून हा संस्मरणीय सामना आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना प्रेमाचे प्रतिक म्हणून फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीने आपली स्वाक्षरी असलेली बार्सिलोना क्लबची जर्सी भेट म्हणून पाठवली आहे. आज ती जर्सी आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितीत डॉ. विजय पाटील यांनी स्वीकारली.
हेही वाचा -