चिंता वाढली, बुधवारी मुंबईत रुग्णसंख्या झाली दुप्पट

मुंबईत मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. बुधवारी मुंबईत ११६७ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत होती. मुंबईत मंगळवारी ६४३ नवीन रुग्ण आढळले होते. मात्र बुधवारी अचानक ही संख्या दुप्पटीने वाढली आहे. 

मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ३ लाख २१ हजार ६९८ इतकी झाली आहे. बुधवारी ३७६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख १ हजार ५७ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ८३२० अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. 

बुधवारी ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोना बळींची संख्या ११४५३  झाली आहे. मुंबईत १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीदरम्यान कोरोनावाढीचा दर ०.२४ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २९४ दिवसांवर आला आहे. 

वांद्रे पश्चिम, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, वडाळा, अंधेरी पश्चिम, कुर्ला, ग्रॅन्ट रोड या भागात कोरोना रुग्णवाढ अधिक असल्याचं आढळून आलं आहे.  या भागात आता रोज प्रत्येकी ४० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तर अंधेरी पश्चिाम भागात ही संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या