मुंबईत कोरोनाच्या १४ लाख चाचण्यांचा टप्पा पार

मुंबईत कोरोनाच्या (corona) वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिका दररोज कोरोनाच्या चाचणी (covid test) करत आहेत. तसंच, मुंबईतील कोरोना चाचण्यांनी १४ लाखांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी १५६०० चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १४६३ रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचं गुरुवारी समोर आलं आहे. दर दिवशी १८ ते २० चाचण्या करण्याचे लक्ष्य पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते.

महापालिकेनं दिलेलं हे लक्ष्य गाठता आलेलं नसलं तरी चाचण्यांची संख्या वाढली आहे. दर दिवशी १० ते १५ हजार चाचण्या होत आहेत. गुरुवारी १४६३ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळं एकूण रुग्णसंख्या २,४७,३३४ झाली आहे. तर एका दिवसात १२८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत २,१६,५५८ म्हणजेच ८८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

१९,४९१ रुग्ण उपचाराधीन असून, रुग्णवाढीचा दर ०.६४ टक्के इतका खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १०८ दिवसांवर गेला आहे. गुरुवारी ४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा ९९१८ वर गेला आहे. ४९ मृतांपैकी ३९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर ३५ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. मुंबईतील मृत्यूचा दर ४ टक्क्यांपर्यंत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या