पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी १९६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवार (९ ऑक्टोबर) १९६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर कामोठ्यातील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३६, नवीन पनवेल २४, खांदा काॅलनी ९, कळंबोली ३५, कामोठे ५२, खारघर ३६, तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५१,  नवीन पनवेल ३४, कळंबोली ५२, कामोठे ६६, खारघर ५०,  तळोजा येथील ८  रुग्णांचा समावेश आहे.   

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २११४७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १८९११ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४९० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १७४६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा - 

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार लोकल?

मुंबई लोकलबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना


पुढील बातमी
इतर बातम्या