कल्याण डोंबिवलीमध्ये सोमवारी कोरोनाचे नवीन २५० रुग्ण

कल्याण डोंबिवलीमध्ये सोमवारी कोरोनाचे नवीन २५० रुग्ण आढळले. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी आतापर्यंत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मृतांचा आकडादेखील तेवढाच वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

सोमवारी ४८३ जणांना २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या आता २४,६७० झाली आहे. यामध्ये ३५३१ रुग्ण उपचार घेत असून २०,६३६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ३३,  कल्याण पश्चिम ५२,  डोंबिवली पूर्व ९९, डोंबिवली पश्चिम  ४०, मांडा टिटवाळा १८, मोहना  ७, तर पिसवली येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ११ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ३ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, १० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून, होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

'या' १० वॉर्डमध्ये ४६ टक्के कोरोना रुग्ण, पालिका देणार विशेष लक्ष

COVID 19 लसीच्या केईएम रुग्णालय घेणार चाचण्या


पुढील बातमी
इतर बातम्या