नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३९८ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३९८ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १४ हजार ९८७ झाली आहे.  

शुक्रवारी बेलापूर ५७, नेरुळ ९४, वाशी ५२, तुर्भे १८, कोपरखैरणे ६४, घणसोली ६०, ऐरोली ४६, दिघामध्ये ७ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३१, नेरुळ ५३, वाशी ३३, तुर्भे ९, कोपरखैरणे २३, घणसोली ३५, ऐरोली ५९ आणि दिघामधील ६ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १०३६५ वर पोहोचली आहे.  तर मृतांचा आकडा ४१८ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ४६०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असून पालिकेने मिशन ‘ब्रेक द चेन’ ची मोहिम सुरू केली आहे.


हेही वाचा -  

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

मुंबईत ६१६ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे यादी


पुढील बातमी
इतर बातम्या