राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ४७८७ रुग्ण

राज्यात रोज रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे नवीन ४७८७  रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  रुग्णांच्या संख्येहून अधिक आहे.

बुधवारी ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८५ हजार २६१ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के झालं आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय. सर्व निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असल्याने गर्दी वाढत आहे. त्यामुळे संसर्ग अधिक वेगाने वाढत आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णां संख्या ३८ हजार १३ आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ५१,६३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५४ लाख ५५ हजार २६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ७६ हजार ०९३ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.४३ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला केलं आहे.


हेही वाचा -

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण


पुढील बातमी
इतर बातम्या