पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ४८ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१४ जानेवारी) ४८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच पनवेलमधील एका मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ७,   नवीन पनवेल १० खांदा काॅलनी २, कामोठे १२, खारघर १४, तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १४, नवीन पनवेल ११,  कळंबोली २, कामोठे १, खारघर येथील १९ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८१४९ कोरोना रूग्णांपैकी २७१५० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३८० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

"सीरमसाठी भावनिक क्षण", पुनावाला यांनी शेअर केला टीमसोबत फोटो

‘फिल्मी स्टाईल’ने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला


पुढील बातमी
इतर बातम्या