पनवेलमध्ये हत्तीरोगाचे 52 रुग्ण आढळले

Representational Image
Representational Image

पनवेल (panvel) जिल्ह्यात हत्तीरोगाचे 52 रुग्ण आरोग्य विभागाकडे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 25 तर ग्रामीण भागात 27 रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिका क्षेत्रात चार, नवीन पनवेल परिसरात तीन आणि नावडे गावात एक रुग्ण आढळून आला आहे. सध्या महापालिकेने हत्तीरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ही शोध मोहीम राबविली आहे.  

पनवेल तालुक्याची लोकसंख्या 13 लाख आहे. त्यापैकी महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 10 लाख आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रोहिजन, पेंढार, पनवेल शहरातील कोळीवाडा, तळोजा पंचनंदनगर या गावांसह हत्तीरोगाचे (Elephantiasis) सर्वाधिक रुग्ण महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहेत.

पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी (Dr. aanand Gosavi) यांनी हत्तीरोग झालेल्या रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप केले. तसेच या रुग्णांवरील शस्त्रक्रियेसाठी पालिका सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हत्तीरोग असलेल्या रुग्णाच्या विशिष्ट वाढीनंतर, रुग्णाच्या हालचालींवर कठोर उपाय-योजना राबवल्या जात आहेत. त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. या रुग्णांना  मुक्तपणे फिरण्याचीही मुभा नाही.  

हत्तीरोग झालेल्या रुग्णांच्या पायाला सुज येते आणि पायांच्या हालचालीवर मर्यादा येते, रुग्णाला इतरांच्या मदतीशिवाय हालचाल करता येत नाही. त्यामुळे रुग्णाला एक प्रकारचे अपंगत्व येते. शासन निर्णयातील तरतुदीनुसार अशा रुग्णांची जिल्हा शल्यचिकित्सकामार्फत (surgery) तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र दिले जाते.


हेही वाचा 

महाराष्ट्रात H1N1 चा संसर्ग पसरतोय, रुग्णसंख्या 400 पार...

अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासा मृत अवस्थेत आढळला

पुढील बातमी
इतर बातम्या