आरोग्य शिबिराचा भांडुपकरांना लाभ

खडीमशीन - भांडुप पश्चिमेकडील सह्याद्री सेवा प्रतिष्ठाननं आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात 160 भांडुपकरांनी हजेरी लावली. अंधेरीच्या सेव्हन हिल्स हाॅस्पिटल आणि युवा प्रेरणा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केलं होतं. यापैकी आठ हृदयरोग असलेल्या रुग्णांना उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सह्याद्री सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमेंद्र शृंगारे यांनी सांंगितलं.

आरोग्य शिबिरात ईसीजी तपासणी, केमो आणि रेडीएशन उपचार, ब्लडप्रेशर तपासणी, किडनी डायलसिस, दंत चिकित्सा, हृदय शस्त्रक्रीया इत्यादी सेवा तज्ज्ञ डाॅक्टरांकडून देण्यात आल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या