रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

कोळीवाडा - संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं शिवडी पूर्वेकडील कोळीवाड्यातल्या कोळी समाज हॉलमध्ये सोमवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 7 ते 12 पर्यंत हे शिबीर झालं. यामध्ये 175 जणांनी रक्तदान केल्याची माहिती फाउंडेशनचे संचालक मोहन धुरी यांनी दिली. या शिबिरात केईएम रुग्णालयाचे डॉक्टरही सहभागी झाले होते. संकलित केलेलं रक्त केईएम रुग्णालयाला दिलं जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या