कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांचा आकडा ९०० च्या वर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना मृतांच्या संख्येने ९०० चा आकडा पार केला आहे. रविवारी महापालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन ३११ रुग्ण आढळले. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४६,१८७ झाली आहे. यामध्ये ३४५१ रुग्ण उपचार घेत असून ४१,८३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६५, कल्याण प – ९१, डोंबिवली पूर्व ८२, डोंबिवली प ५१, मांडा टिटवाळा १४, मोहना ७, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०१ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १० रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ६ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

हेही वाचा

तब्बल अडीच तासांनी मुंबईतील वीजपुरवठा सुरुळीत

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिवशाही बसच्या संख्येत वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या