दहिसरमध्ये डॉक्टरांचा मूक मोर्चा

दहिसर - डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ 23 मार्चला दहिसरमधील मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी मूक मोर्चा काढला. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी महापालिका आणि राज्य सरकारने काहीच केलं नाही. डॉक्टरांना अजूनही सुरक्षा दिली गेली नाही. 


त्याच्याच विरोधात निवासी डॉक्टरांनी मूक मोर्चा काढत निषेध दर्शवला. त्यामुळे तब्बल 3 हजार पॅथॉलॉजी लॅब बंद पडल्या आहेत. याचा त्रास इथल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या