मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २७ दिवसांवर गेला आहे. यापूर्वी हा कालावधी 25 दिवस होता. मुंबईत रोज दीड ते दोन हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. रोजचा रुग्णवाढीचा दर सरासरी २.६५ टक्के आहे.
दहिसर, बोरिवली, कांदिवली, मुलुंड, भांडुप या भागांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत. तर वांद्रे, धारावी, दादर, माहीम, कुर्ला या भागांतील रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. येथील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४० दिवसांपेक्षा जास्त आहे. भायखळा, नागपाडा परिसरातील रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे.
बोरिवलीमध्ये रुग्ण वाढत असून या ठिकाणी १५५१ रुग्ण आहेत. के पूर्व (अंधेरी पूर्व) मध्ये कोरोना आकडा ४०७६ झाला आहे. रुग्णसंख्येत के पूर्व हा भाग सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. या भागात १६९६ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले असून सध्या २२०६ रुग्ण आहेत.
पालिकेकडे सध्या 50 हजारांहून जास्त बेड उपलब्ध आहेत. 10 हजार 400 बेड पालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. यामध्ये पुढील दहा दिवस प्रतिदिन 300 आयसीयू बेड वाढवण्यात येणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत 168 ठिकाणी डायलिसिसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढय़ात लवकरच यशस्वी होऊ असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -
मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता
कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा