ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी २७२ दिवसांवर

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचं दिसून येत आहे. येथील रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल २७२ दिवसांवर गेला आहे. तर प्रभाग समितीनिहाय साप्ताहिक रुग्णवाढीचा वेगही घटला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४७ हजार ९९८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामधील ९४.५३ टक्के म्हणजेच ४५ हजार ३७२ रुग्ण बरे  होऊन घरी परतले आहेत. शहरात सध्या १५११ (३.१५ टक्के कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसंच मृत्युदर कमी होऊन २.३२ टक्के  झाला आहे. 

पालिका क्षेत्रात रोज साडेपाच ते सहा हजारांच्या आसपास कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये यापूर्वी दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळून येत होते.आता चाचण्या तितक्याच होत असताना रुग्णसंख्येत घट झाली आहे. आता दररोज १२५ ते १५० रुग्ण आढळून येत आहेत.  

रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ८.७२ टक्के आहे. यापूर्वी ते दहा टक्क्य़ांच्या आसपास होते. मागील काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यामुळे कोरोना फैलाव नियंत्रणात आला आहे.


हेही वाचा -

लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी 'ॲप'

मुंबईसह राज्यातील किमान तापमानात घट


पुढील बातमी
इतर बातम्या