अँटीजेन टेस्ट केली तरच एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश

नवी मुंबई परिसरातील कोरोना रुग्ण संख्या रोज वाढतच आहे. एपीएमसी मार्केटमधील संचालक ,सचिव आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

एपीएमसीमधील पाचही मार्केटमध्ये रोज मोठी गर्दी होत आहे. काही व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहक मास्क वापरत नसल्याचं दिसून येत आहे. येथे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे  अँटीजेन टेस्ट केल्याशिवाय एपीएमसी मार्केटमध्ये कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

एपीएमसी मार्केटमध्ये प्रशासनाच्यावतीने नो अँटीजेन टेस्ट, नो एंट्री सुरु करण्यात आली आहे. एपीएमसी प्रशासनाच्या वतीने सॅनिटायजिंग करणे, मास्क वापरणे बंधनकारक, आणि सामाजिक अंतर पाळणे आदी उपाययोजना सुरु केल्या आहेत. तर बाजार आवाराशी संबंधित सर्व घटकांना ७ एप्रिलपर्यंत अँटीजेन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अँटीजेन टेस्ट केली नसल्यास त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम तीनशे ऐवजी पाचशे रुपये करण्यात आली आहे. बाजार आवारातील सर्व घटकांनी एपीएमसी प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन सभापती अशोक डक यांनी केलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत मार्चमध्ये कोरोना रुग्ण संख्येत ४७५ टक्के वाढ

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या