एक्सर गावात लवकरच पहिली नेत्रपेढी

बोरिवली - एक्सर गावात लवकरच पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुंबई महापालिका क्षेत्रातली पहिली नेत्रपेढी सुरू होणार आहे. या नेत्रपेढीच्या माध्यमातून नेत्रदानात प्राप्त झालेल्या डोळ्यांवर आवश्यक शस्त्रक्रिया, शास्त्रीय पद्धतीने अशा डोळ्यांचं जतन आणि जतन केलेले डोळे नेत्ररोपणासाठी उपलब्ध करून देणं अशी कामं होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे नेत्रपेढीतील सर्व सेवा रुग्णांसाठी मोफत असतील. अशा नेत्रपेढीसाठी मागवलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून नेत्रपेढीचा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याचं कार्यकारी आरोग्य अधिकारी डाँक्टर पद्मजा केसकर यांनी सांगितलं. नेत्रपेढीच्या उभारणीचे कंत्राट ज्या संस्थेला देण्यात येईल, त्या संस्थेवरच नेत्रसंकलन, जतन आणि वितरणाचीही जबाबदारी असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या