रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य शिबीर

चेंबूर - रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. खारदेवनगर परिसरात शनिवारी भाजपच्या प्रभाग क्रमाक 153 च्या वतीने या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आरोग्य तपासणी आणि फस्ट एड बॉक्सचे वाटप करण्यात आले. भाजपचे दक्षिण मुंबईचे जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 600 पेक्षा जास्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती आयोजक नागेश तवटे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या