सांताक्रुझमध्ये आरोग्य शिबीर

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

सांताक्रुझ- सांताक्रुझ पूर्वमधील डवरीनगर परिसरात नगरसेविका पूजा महाडेश्वर यांनी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच यावेळी रुग्णांना तपासणीबरोबर मोफत औषधे देखील वाटण्यात आले. याच बरोबर कसे आणि कुठे डेंग्यूच्या डासांची पैदास होते याची देखील माहिती पुरवली गेली. डेंग्यू होऊ नये म्हणून किती दिवसाने परिसर स्वच्छ करावा असे खबरदारी उपाय यावेळी नागरिकांना सांगण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ महाडेश्वरांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम पार पडला.

पुढील बातमी
इतर बातम्या