'जीएसके' अडचणीत

मुंबई - कुत्रा वा इतर जनावर चावल्यानंतर उपचारासाठी रॅबीपुर लस दिली जाते. ही लस वेळेत उपलब्ध न झाल्यास रुग्णाच्या जिवाला धोका पोहचू शकतो. अशा अनेक घटना याआधी घडल्याचंही सांगितलं जातं. असं असताना नामांकीत कंपनी ग्लॅक्सो स्मिथक्लाइन फार्मास्युटीकलने रॅबीपुरसारख्या लस वितरणाला नकार दिला आहे. ही लस जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असून असा नकार देणे गुन्हा असल्यानं एफडीएने भिवंडी पोलीस ठाणे (ग्रामीण) इथं कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती दक्षता विभागाचे प्रमुख हरिश बैजल यांनी दिली आहे.

अंधेरीतील मे. नॉर्थ वेस्ट फार्माने 16 सप्टेंबर ते 22 नोव्हेंबरदरम्यान सहावेळा रॅबीपुर लसची मागणी कंपनीकडे केली. यादरम्यान कंपनीने 1,28,410 लसची विक्री केली. पण नाँर्थ वेस्टला इंजेक्शन देण्यास जाणिवपूर्वक नकार दिला. त्यामुळे नॉर्थ वेस्टने एफडीएकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार एफडीएने केलेल्या कारवाईत कंपनी दोषी असल्याचं स्पष्ट झाल्यानं एफडीएनं याप्रकरणी गुन्हा नोंदवत कंपनीला दणका दिला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या