घाटकोपरमध्ये मोफत आरोग्य तपासणी

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

घाटकोपर – येथील हिराचंद देसाई रोडवर ‘युनिकेअर हेल्थ सेंटर’च्या वतीने मोफत आरोग्य तपासणीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोबाइल हेल्थ सेंटरद्वारे मंगळवारी सकाळी ९.३० पासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक जणांना संपूर्ण बॉडी स्कॅनिंग, ब्लड टेस्ट, नाडी परिक्षण, डायबेटिस, कोलेस्ट्रोल, ब्लड प्रेशर, थायरॉईड यांचा तपासणी करता आली. आहार सल्लाही देण्यात आला. केवळ तपासणीच नाही, तर या हेल्थ सेंटरद्वारे रुग्णांना माफक दरात औषधंही देण्यात येतायत. जीवनऊर्जा फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ यंग डोंबिवली यांच्या वतीनं हे ‘युनिकेअर हेल्थ सेंटर’ चालवण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या